Sun. Aug 18th, 2019

जाणून घ्या संविधान दिवसाचं महत्व

0Shares

आज संविधान दिनानिमित्त नागपूरमध्ये दीक्षाभूमी ते संविधान चौक “वॉक फॉर संविधान” काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने नागपूरकरांनी सहभाग घेतला.

विशेषकरून लहान मुलं महाविद्यालयीन विध्यार्थी मोठ्या संकेत उपस्थित होते. लोकांमध्ये संविधानाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने नागपूर मध्ये ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले.

मात्र संविधान दिन हा फक्त आंबेडकरी अनुयायांनी साजरा करणारा उत्सव नाही तर संपूर्ण जनतेने यात सहभागी व्हायला हवे. स्वतंत्रता दिन व प्रजासत्ताक दिना प्रमाणे भारतात संविधान दिन साजरा करायला पाहिजे अशी मागणी वॉक फॉर संविधानचे आयोजक व माजी सनदी अधिकारी ईझेड खोब्रागडे यांनी मागणी केली आहे.

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, यात 448 अनुच्छेद, 12 अनुसूचने आणि 94 सुधारणा समाविष्ट आहेत. हे हस्तलिखित संविधान आहे त्यात 48 आर्टिकल आहेत. ते तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांचा वेळ लागला.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *