Tue. Mar 31st, 2020

राज्यभरात मराठी भाषेचा जागर, विविध कार्यक्रमांच आयोजन

मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्शी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो.

मराठी भाषा दिनानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन जनतेला मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मनसेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन एक ट्विट केलं आहे.

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा, असं ट्विट मनसेने केलं आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट केलं आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

महाराष्ट्राची जान मराठी
महाराष्ट्राची शान मराठी
जगाच्या कानाकोपर्‍यात आज गर्जते मराठी !

मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

तसेच राज्यभरात मराठी भाषादिनानिमित्ताने विविध सांस्कृतिक आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *