इजिप्तमध्ये दहशतवाद्यांचा बसवर हल्ला, 26 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, इजिप्त

 

इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन लोकांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यात तब्बल 26 लोकांचा मृत्यू झाला.

 

दक्षिण काहिरापासून 250 किमीवर असणाऱ्या मिन्या प्रांतात हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. कॉप्टिक ख्रिश्चन लोकांना घेऊन जाणाऱ्या बसवर हा हल्ला झाला. याआधी सुद्धा कॉप्टिक बसवर अशा प्रकारचे हल्ले करण्यात आले होते.

Exit mobile version