Thu. May 13th, 2021

दुर्दैवी! नाशिकमधील 298 मराठी शाळा बंद व्हायच्या मार्गावर

किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक

ज्या व्यक्तीच्या जन्मदिनी आपण महाराष्ट्रात मराठी दिवस साजरा करतो, त्याच कवी कुसुमाग्रज यांचा जिल्ह्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील जवळपास 3 हजारांहूनही अधिक शाळांपैकी तब्बल 298 शाळा बंद पडण्याचा मार्गावर आहेत. कारण या शाळेतील पटसंख्या 20 हून कमी आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार ज्या शाळेत पटसंख्या 20 हून कमी असते, ती शाळा बंद करावी लागते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 298 शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत. ही अवस्था कवी कुसुमाग्रज यांचा जिल्ह्यातील आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागात काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.

गेल्या काही वर्षांपासून शहरासारखीच ग्रामीण भागात देखील पालक आपल्या मुलांना खासगी आणि इंग्रजी माध्यमात टाकत असल्याने जिल्हा परिषद शाळेची ही अवस्था झाली आहे त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे असं मत अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर महापालिका अंतर्गत येत असलेल्या मराठी शाळांची देखील फार काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे राज्यातील मराठी शाळा टिकवायची असेल तर आधुनिक होणं गरजेचं आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात 3 हजारांहून अधिक शाळा आहेत. यांपैकी सध्या 298 शाळांची अवस्था बिकट असलीतरी येणाऱ्या काळात यावर ठोस काम झाले नाहीतर हे आकडे अजून वाढतील हे देखील नकारता येणार नाही त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना मराठी शाळांकडे पुन्हा एकदा प्रशासन कशा प्रकारे वळवतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *