Sun. Nov 28th, 2021

कळंबोली येथे बॉम्ब सापडल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक

कलंबोळी येथे सापडलेल्या बॉम्ब प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांकडून आणखीन एक जिवंत बॉम्ब ही हस्तगत करण्यात आला आहे.

कलंबोळी येथे सापडलेल्या बॉम्ब प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांकडून आणखीन एक जिवंत बॉम्ब ही हस्तगत करण्यात आला आहे. या बॉम्बमध्ये अमोनिया नायट्रेट आणि जिलेटीनचा वापर करण्यात आला होता. या बॉम्बचा वापर बिल्डरला धमकावून दोन कोटींची खंडणी मागण्यासाठी करण्यात येणार असल्याचे नवी मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

17 जूनला सुधागड हायस्कुलच्या जवळ हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता.

पुणे येथे राहणारा सुशिल साठे तर नवी मुंबईतील उलवे येथे राहणारे मनीष भगत आणि दीपक दांडेकर या तिघांनी हा बॉम्ब तयार केला होता.

पोलिसांनी हा बॉम्ब निकामी केला असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

बॉम्ब ठेवण्याचे नेमकं कारण काय?

या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

यासाठी एका बिल्डरच्या घराच्या परिसरात बॉम्ब स्फोट घडवून उर्वरित बॉम्बची धमकी देण्याचे त्यांनी ठरवलं होतं.

बिल्डर डून 2 कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न हे तिन्ही आरोपी कतर होते. अशी माहिती आहे.

दीपक दांडेकर याची दगडखाण असल्याने या आरोपीला बॉम्ब बनवायचं माहीत होतं.

मात्र बॉम्ब स्फोटाची वेळ जुळवता आली नसल्याने बॉम्बचा स्फोट होऊ शकला नाही..

हे तिघं ही आरोपी कोणत्याही दहशतवादी संघटणांशी संबंधित नसल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *