#SriLanka : कोलंबोमध्ये बॉम्बस्फोटात 3 भारतीयांचा मृत्यू

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये 8 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले.या साखळी बॉम्बस्फोटात 207 लोकांचा मृत्यू झाला तर 400 जखमी झाले आहेत.कोलंबो शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या पार्श्वभूमीवर आपण कोलंबोतील भारतीय दूतावासाशी सतत संपर्क ठेवून असल्याचेही ट्विट केलं आहे. साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला असल्याचीही माहीती सुषमा स्वराज यांनी दिली आहे.लोकेशीनी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी या तिघा भारतीयांची नावे आहेत.

तीन भारतीयांचा मृत्यू

श्रीलंकेतील सेंट अँथनी चर्च ( कोलंबो ),सेंट सेबॅस्टिअनस चर्च ( नेगंबो ),बट्टिलकलोबा चर्च,

शांग्रीला हॉटेल,सिन्नमोन ग्रँड हॉटेल,किंग्सबरी हॉटेल, देहिवेला भागात हे बॉम्बस्फोट झाले आहेत.

ईस्टरच्या दिवशी चर्च आणि हॉटेलमध्ये हे बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत.

या साखळी बॉम्बस्फोटात 207 लोकांचा मृत्यू झाला तर 400 जखमी झाले आहेत.

कोलंबो शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे.

मदत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत.

साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला असल्याचीही माहीती सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

लोकेशीनी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी या तिघा भारतीयांची नावे आहेत.

Exit mobile version