Tue. May 11th, 2021

लोकसभा निवडणूक; महाराष्ट्रासाठी इतक्या शाईच्या बाटल्या

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने त्याची तयारीही सुरू झाली आहे.निवडणुकीत मतदान केल्यानंतर मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते.यासाठी महाराष्ट्रात सुमारे 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे.राज्यात 48 मतदार संघांत सुमारे 95 हजार मतदान केंद्र आहेत.यामध्ये शाईच्या बाटल्यांसोबतचं मतदानासाठी आवश्यक ते साहित्य पुढील आठवड्यात पोहोचवण्याचे प्रयत्न निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

मतदानानंतर का लावली जाते शाई ?

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो.

प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते.

त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.

निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात 48 मतदार संघांत पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो लोकप्रतिनिधी किंवा सेलिब्रिटी ही शाई लावली जाते.

लोकशाही मजबूत करणारा हा काळा ठिपका निवडणुकांचा अविभाज्य असा घटक समजला जातो.

मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

महाराष्ट्रात सुमारे 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *