Fri. Feb 21st, 2020

धक्कादायक! नागपूरमध्ये तीन तासात तीन हत्या

नागपूर मध्ये एका रात्री घडलेल्या तीन वेगवेगळ्या हत्याकांडाने शहरात एकच खळबळ माजली आहे. सायंकाळी 8 ते 11 च्या दरम्यान नागपूर शहरातील सदर , हसनबाग व दिघोरी भागात या हत्यासत्राचा थरार घडला आहे.

नागपूर मध्ये एका रात्री घडलेल्या तीन वेगवेगळ्या हत्याकांडाने शहरात एकच खळबळ माजली आहे. सायंकाळी 8 ते 11 च्या दरम्यान नागपूर शहरातील सदर , हसनबाग व दिघोरी भागात या हत्यासत्राचा थरार घडला आहे. तर याच रात्री खामला भागात चोरट्यांनी चार एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही.

तीन तासात 3 हत्या

काल एकाच रात्री नागपूरच्या गुंडांनी कहरच केला. तीन तासाच्या अंतरात तीन हत्या केल्या. पहिल्या घटनेत मोफत भाजी न दिल्याने गुंडांनी हसनबाग भागात मृतक सैयद इम्रान सय्यद नियाज या 26 वर्षीय युवकाची चाकू ने भोकसून हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत दिघोरी भागात विक्की डाहाके या 19 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. तिसऱ्या घटनेत गोंडवाना चौकात ऋषी खोसला यांची पैशाच्या वादातून धारधार शास्त्राने हत्या करण्यात आली.

शहरात एका रात्रीत तीन हत्या झाल्याने पोलीस हाय अलर्ट वर होते. संपूर्ण शहरात तिन्ही हत्येच्या घटनेतील आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. याच काळात खामला परिसरात एक किलोमीटर अंतरावरचे चार एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. बाईकवरुन आलेल्या भामट्यांनी आरी आणि हातोडीच्या मदतीनं SBI, ICICI, बॅंक आॅफ इंडिया आणि IDBI बॅंकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

चोरट्यांनी आधी एटीएम फोडलं. मात्र, त्यातून पैसे काढता आले नाही. मग दुसरं एटीएम फोडलं मात्र, त्यातूनंही पैसे काढता आले नाही. त्यानंतर आणखी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. कुठल्याही एटीएम मधून चोरट्यांना पैसे काढता आले नाही. तीन तासाचा पिक्चर बघावा तसा नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात हत्येचा व लुटीचा थरार सुरु होता. अजून हि दोन हत्याकांडाची आरोपी मोकाट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *