Mon. Dec 6th, 2021

झारखंडमध्ये दोन नक्षलवादी ठार

झारखंडच्या गुमला जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये पहाटे चकमक सुरू झाली. या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. कामडारा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आमटोली जंगल भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू झाली होती. तसेच पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जंगलात काही नक्षलवादी लपल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. म्हणून पोलिसांनी परिसरात शोध मोहिम सुरू केले आहे. त्याचबरोबर घटनास्थळाहून २ एके-४७ रायफल्सही जप्त करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं ?

जंगलात नक्षलवादी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली.

पोलीस आणि कोबर बटालियनद्वारे कामडारा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आमटोली या जंगल भागात शोध मोहिम सुरू झाली.

पोलिसांनी नक्षलवादी लपून बसलेल्या संपुर्ण क्षेत्रास घेरा घातला आणि नक्षलवादींना  शरण येण्यास सांगितले.

मात्र नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

दोन्ही बाजूंच्या गोळीबारानंतर दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले.

कामडारा पोलीस आणि कोबर बटालियनद्वारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

नक्षलवाद्यांकडून दोन एके ४७ रायफल्स  , दोन ३१५ एमएम रायफल्स आणि एक पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *