Sat. Feb 29th, 2020

आईचे अनैतिक संबंध मुलीच्या आणि नातीच्या जिवावर बेतले…

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून 3 जणांना जीवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 10 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला असून 2 महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून आरोपी प्रियकर मात्र सध्या फरार आहे.  

माहेरी आलेल्या एका विवाहितेला तिच्या आईच्या अनैतिक संबंधांचा मोठा फटका बसला आहे. आईच्या प्रियकरानं रागाच्या भरात तिन जणांना जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत 10 महिन्यांच्या चिमुरड्या मुलीचा मृत्यु झालाय, तर तिच्या आई आणि आजीवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
नाशिकच्या पंचवटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 
आईचे अनैतिक संबंध मुलीच्या आणि नातीच्या जिवावर बेतले आहेत. पंचवटीच्या फुलेनगर भागात राहणा-या 38 वर्षीय संगिता देवरे यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलीसांच्या चौकशीत समोर आली आहे. संगिता देवरे यांची 20 वर्षीय मुलगी प्रिती शेंडगे आणि तिची 10 महिन्यांची सिद्धी शेंडगे या दोघी आजीकडे राहण्यासाठी आल्या होत्या.
 
 
पहाटेच्या सुमारास प्रियकर जलील पठाण आणि संगिता यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर संतप्त झालेल्या जलीलनं संगिता, प्रिती आणि  सिद्धी या तिघींच्या अंगावर रॉकेल टाकुन त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत 10 महिन्यांची सिद्धी जळुन मृत झाली तर संगिता आणि प्रिती या मायलेकींवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
  
या प्रकरणी प्रितीच्या नव-यानं सासुच्या अनैतिक संबंधांमुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं असून पोलीसांनी तातडीनं आरोपीला अटक करावी अशी मागणी केली आहे. 
 
दरम्यान या घटनेत संगिता देवरे 90 टक्के तर प्रिती शेंंडगे 65 टक्के जळल्यानं त्यांची प्रकृती गंभीर आहे. मात्र या घटनेनंतर पोलीसांनी आरोपीच्या शौधार्थ पथक रवाना केले असुन या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
 
नाशिकमध्ये तीनजणांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न
  • नाशिकच्या पंचवटी पुलेनगर भागातील घटना
  • अनैतिक संबंधातून घडला प्रकार
  • 10 महिन्याच्या मुलीचा मृत्यू
  • संगीता देवरे , प्रीती रोंडगे या दोघी गंभीर जखमी प्रीती रोंडगे वय 19 या दोघी गंभीर जखमी
  • सिध्दी रोंडगे या दहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू
  • जखमीना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल
  • आरोपी प्रियकर सध्या फरार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *