‘संघर्ष’यात्रेदरम्यान नाशकात 3 शेतकऱ्यांचा व्यासपीठावरच आत्महत्येचा प्रयत्न
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
‘संघर्ष‘यात्रेदरम्यान नाशिकमधील पिंपळगातील सभेत आम्हाला फाशी द्यावी, अशी मागणी करत तीन शेतकऱ्यांनी विष पिण्याचा प्रयत्न केला.
नाशिकमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे पाटलांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करत हे तीन शेतकरी व्यासपीठावर आले.
त्यावेळी त्यांच्या हातात विषाची बाटली आणि दोर होते. कर्जमाफी दिली नाही तर आत्महत्या करण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला.
‘सरकार कर्जमाफी देत नसेल तर, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या.’ अशा घोषणा या शेतकऱ्यांनी यावेळी दिली.