Sat. Jun 6th, 2020

पतीच्या पगारातील 30% रक्कमेवर पत्नीचा हक्क!

पती पत्नी यांच्या घटस्फोट झाल्यास विभक्त झाल्यास पोटगी देण्याची पद्धत असते. मात्र पतीच्या एकूण पगारातील 30 टक्के भाग विभक्त पत्नीला आता पोटगीच्या रूपात देण्याचे आदेश दिल्ली High court ने दिले आहेत.

काय आदेश आहे दिल्ली हाय कोर्टाचे?

कुटुंबातील इतर कुणी सदस्य पतीच्या कमाईवर अवलंबून नसल्यास पतीच्या पगारातील दोन भाग पतीकडे राहतील.

मात्र तिसरा भाग विभक्त पत्नीला द्यावा लागेल, असं दिल्ली हाय कोर्टाने म्हटलं आहे.

कसा घेण्यात आला निर्णय?

एका महिलेने पोटगीसाठी ठरलेली रक्कम पोटगीमध्ये मिळत नसल्याबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती.

तिचा पती CISF मध्ये निरीक्षक आहे.

दोघे पती-पत्नी 15 ऑक्टोबर 2006 मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले.

त्यानंतर मिळणाऱ्या पोटगीमध्ये पतीच्या एकूण पगारातील 30% भाग द्यावा, असे निर्देश कोर्टाने 21 फेब्रुवारी 2008 ला दिले.

मात्र या निर्णयाला पतीने आव्हान दिलं.

त्यानंतर कोर्टाने पोटगीची रक्कम कमी करून ती 15% केली.

मात्र एवढ्या कमी रकमेविरोधात पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

दिल्ली उच्च न्य़ायालयाने आता पत्नीला एकूण पगारातील 30 % वाटा देण्याचे पतीला आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *