Mon. Aug 26th, 2019

CSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असं या तरुणीचं नाव असून ती 30वर्षांची होती.

0Shares

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असं या तरुणीचं नाव असून ती 30वर्षांची होती. ही लोकल कोपर-दिवा स्थानकांमध्ये असताना तिचा तोल जावून पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी जीआरपीची टीम दाखल झाली आहे. या लोकलला गर्दी असल्याने हा प्रकार घडला आहे.

लोकलचा आणखी एक बळी

लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटना नेहमी घडत असतात. लोकलने आणखी एक बळी घेतला आहे.

सविता नाईक असं या ३० वर्षीय तरुणीचं नाव असून ती डोंबिवलीहून सीएसएमटीला जाणाऱ्या गाडीने प्रवास करीत होती.

ही लोकल कोपर-दिवा स्थानकांमध्ये असताना तिचा तोल जावून पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी तात्काळ जीआरपीची टीम दाखल झाली मात्र तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

या लोकलमध्ये जास्त गर्दी असल्याने असा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहेत.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत काही वेळात सविताचा मृतदेह थोड्याच वेळात त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केला आहे.

लोकलमधून पडून जीव जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. 18 जुलैला एकाच दिवशी 16 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *