Fri. Jun 18th, 2021

300 वर्षांपासून ‘येथे’ धुळवडीला रंगतो वीरांचा उत्सव!

राज्यभरात धुळवडीचा उत्सव साजरा केला जातो आहे. सर्वत्र धुळवडीनिमित्त रंगांची उधळण असली तरी नाशिकमध्ये मात्र धुळवडीच्या दिवशी वीरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. 300 वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे. यंदाही ऐतिहासिक दाजीबा वीराची मिरवणूक बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

वीरांचा उत्सव!

वेगवेगळ्या देवदेवतांचं सोंग घेऊन हे वीर नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातल्या देवांना स्नान घालतात आणि परततात.

या वीरांमध्ये महत्वाच्या असलेल्या दाजीबा वीराची मिरवणूक सुरू झाली.

शहरात रात्रभर वीरांना मिरवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे वीर घरी परततात.

हे वीर हलगीच्या तालावर नाचत असतात.

त्यात भाविकही मोठ्या आनंदात वीर दाजीबा बरोबर नाचत असतात.

वीर नाचवण्याच्या परंपरेचा 300 वर्षांपासून बेलगावकर घराण्याकडे मान आहे.

शहरातून निघणारा हा दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याचं मानलं जातं.

त्यामुळे भाविक श्रद्धेने आपल्या लहान बाळांना वीरांच्या हातात देऊन नाचवतात.

त्यामुळे बाळ निरोगी आणि सदृढ होत त्यामुळेच वीरांच्या दर्शनाला नाशिककर मोठी गर्दी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *