Fri. Oct 7th, 2022

कॉपी केल्याने ३१९ विद्यार्थी नापास

प्रकारणात एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. जून ते जुलै दरम्यान इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकाल येण्यापुर्वीच एमएसबीटीई मंडळाकडून ३१९ विद्यार्थ्यांना निलंबित केल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. महाविद्यालय प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करून माहिती घेतली असता, सामूहिक कॉपी प्रकरणी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

मौलाना आझाद पॉलिटेक्निकल कॉलेज समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला प्रहार संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. बुधवारी एमएसबीटी संस्थेवर प्रहार संघटनेकडून ३१९ विद्यार्थ्यांना घेऊन भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना घेऊन मोर्चा नेणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे.

एमएसबीटी अंतर्गत पॉलिटेक्निकल कॉलेजमधील सर्व डिप्लोमा शाखेची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र सामूहिकरित्या कॉपी केल्याचा ठपका ठेवून मौलाना आझाद संस्थेतील ३१९ विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलंय. सर्व विद्यार्थ्यांना डिबारही करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.