Tue. Jun 28th, 2022

देशात गुरुवारी ३६ हजार ५७१ कोरोनाबाधित

देशात गुरुवारी ३६ हजार ५७१ कोरोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर  गुरुवारी ३६ हजार ५५५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे.

देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ५८९ रुग्ण दगावले आहेत. तर आठवड्याचा रुग्णवाढीचा दर १.९३ टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ५६ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, रुग्णवाढीचा दर १.९४ टक्के असून हा दर गेल्या २५ दिवसांपासून सलग ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.