Wed. May 19th, 2021

एकापाठोपाठ 38 प्राण्यांच्या मृत्यूमुळे परिसरात भीतीचे वातावरण

विषबाधा होऊन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुण्यामध्येही विषबाधा होऊन प्राणी मरण पावल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान हा घातपाताचा प्रयत्न आहे का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

पुण्यामध्ये वारजे माळवाडी भागामधील गोकुळनगर,पठार परिसरात गुरूवारी दुपारी ७ कुत्रे, ३० डुक्करे आणि १ मांजर मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.

ज्याठिकाणी ही जनावरे मृत्युमूखी पडली. त्याठिकाणी पिठाचे गोळे आढळून आले असून या प्राण्यांना विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही विषबाधा कोणी केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

बीडीपी झोन असलेल्या गोकुळ नगर पठार येथे निलगिरी कॉलनी, दत्तमंदिर शेजारी तसेच आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये दिवसभरात हे प्राणी एका मागोमाग एक मृत झाल्याचे आढळले.

यामुळे या भागात काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती वारजे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांंनी घटनास्थळी धाव घेतली. सदर या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *