Wed. Oct 5th, 2022

आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी ३८१६ पानांचे आरोपपत्र

राज्यातील आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी ३ हजार ८१६ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहेत. त्यानुसार आज याप्रकरणी ‘गट डी’मधील २० हजार आरोपींना न्यायालयात हजार करण्यात येणार आहे.

२६ नोव्हेंबर २०१९ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पुण्याच्या सायबर पोलिसांच्या पथकाने राज्यात छापेमारी केली असून याप्रकरणी २० हजार आरोपींना अटक केली. याप्रकरणात मुख्य आरोपी महेश  गोखले आणि प्रशांत बडगिरे हे असून त्यांनासुद्धा पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. मात्र, अद्याप अनेक आरोपी पोलिसांच्या कचाट्यातून सुटले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले आहे.

टीईटी परीक्षेत बनावट प्रमाणपत्राचा वापर

शिक्षक पात्रता परिक्षेत (टीईटी) राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी इतरांशी संगनमत करून निकाल लागल्यानंतर अनेकांना बनावट प्रमाणपत्रे देऊन त्यांना पास केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सायबर पोलिसांना कारवाई दरम्यान ६५० प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.