Wed. May 19th, 2021

#IndiaElections2019 : विदर्भात मतदानावेळी ईव्हीएमबाबत 39 तक्रारी

लोकशाहीचा उत्सव म्हणजेच 2019 लोकसभा निवडणूकितील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 7 मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 116 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.1 कोटी 30 लाख मतदार याठिकाणी मतदान करणार आहेत. या सर्वच मतदार संघात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान होत असून असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बिघाडल्याच्या ३९ तक्रारी आल्या होत्या. प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

या मतदारसंघात ईव्हीएम मशीनबाबत तक्रारी

विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडाबाबत 39 तक्रारी आल्या आहेत.

प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

वर्धा – 6

रामटेक – 5,

नागपूर -12,

यवतमाळ-वाशिम – 4,

चंद्रपूर – 8,

गडचिरोली – 4

या लोकसभा मतदारसंघातून EVM मशीन बिघाडल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *