Wed. Jul 28th, 2021

#INDvAUS ऑस्ट्रेलिया ३२ धावांनी विजयी

भारत- ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान दिले. मात्र भारतीय संघाने २८१ धावा करत  खेळ आटोपला. ऑस्ट्रेलियाने भारतावर ३२ धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासह मालिकेत २-१ असे पुनरागमन. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि कर्णधार फिंच यांच्या दमदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ५ बाद ३१३ धावा केल्या. उस्मान ख्वाजाने १०४ आणि कर्णधार फिंचने ९३ धावांची खेळी करत ३१३ धावांचे आव्हान दिले आहे. तसेच फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनेही ३१ चेंडूत ४७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाच्या कुलदीपने सर्वाधिक बळी टिपले आहेत.

भारत- ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना –

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकले.

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाने भारताला ३१३ धावांचे आव्हान दिले.

सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि कर्णधार फिंच यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने ३१३ धावांचे आव्हान दिले.

ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ५ बाद ३१३ धावा केल्या.

भारतीय संघाने २८१ धावा करत खेळ आटोपला.

ऑस्ट्रेलियाने भारतावर ३२ धावांनी विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाने विजयासह मालिकेत २-१ असे पुनरागमन.

कर्णधार विराट कोहलीने १२३ धावा करत शतक केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *