Mon. Jan 17th, 2022

नाशिक महापालिकेचे ४ डॉक्टर कोरोनाबाधित

राज्यात कोरोना रुग्ण झपाट्यान आढळत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिकमध्ये २४ तासांमध्ये ५३८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अशातच आता नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागातील ४ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ५३८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५३८ रुग्णांपैकी ४१९ रुग्ण नाशिक शहरातले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या १ हार ८६७वर पोहचली आहे.

नाशिमधील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन चिंतेत आले असून नाशिकमध्ये काही निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नागरिकांना लसीकरण करणे बंधनकारक केले आहे. तसेच येत्या ८ दिवसांत लसीकरण न केलेल्या नागरिकांना राशन न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता, नाशिकमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. तसेच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच १० वर्षाच्या आतील आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मंदिरात परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *