Thu. Oct 1st, 2020

उरण येथील ONGC गॅस प्लांटमध्ये भीषण आग, 4 जणांचा बळी

नवी मुंबई परिसरातील उरण येथे आज सकाळी सात वाजता लिक्विड गळतीमुळे ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनेजला भीषण आग लागली.

नवी मुंबई परिसरातील उरणच्या सीएफयू दोन या भागात  आज सकाळी सात वाजता लिक्विड गळतीमुळे ONGC गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनेजला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 4 जणांचा बळी गेला असुन अनेक जण जखमी आहेत. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

उरणमधील ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये नेमकं काय घडलं ? 

सकाळी सात वाजेच्या सुमारास प्लँटमध्ये आगीचा भडका उडला.

सीएफयू दोन या भागात प्लँटच्या ड्रेनेज प्रोसेसिंग पाईपलाईनला लिक्विड गळतीमुळे आग लागली

आगीत होरपळल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू  तर मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांचा समावेश

अचानक आग लागल्यानंतर गोंधळ उडाला. मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता

आग लागल्यानंतर जेएनपीटी आणि ओएनजीसीच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

आगीमुळे आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित स्थळी हलविले

ओएनजीसीच्या या प्रकल्पापासून एक किलोमीटरपर्यंत नागरिकांना प्रवेश बंद

तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश

गेल्याच महिन्यात या प्लांटमध्ये स्फोट होऊन आग लागली होती.

ओएनजीसीचा प्लांट मोठा असला तरी यातील सामग्रीही जुनी झालेली आहे. यामुळे या प्लांटला गळतीचा धोका कायम

आगीमुळे कामगार व आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *