Jaimaharashtra news

ऐकावं ते नवलच…वसईत जन्मली चार पायांची कोंबडी!

वसईत चक्क चार पायांच्या कोंबडीचा जन्म झाला आहे. ही कोंबडी पाहून तिचा मालकही अवाक् झाला आहे. अशा प्रकारच्याही कोंबड्या असतात का असा त्यांना प्रश्न पडलाय.

गास गावात राहणाऱ्या कॉर्नेलियस पास्कल अल्फान्सो यांच्या घरात 29 डिसेंबर 2019 रोजी एका दुर्मिळ अशा चार पायांच्या कोंबडीचा जन्म झाला. सर्वसामान्य कोंबडीला दोन पाय, दोन पंख, दोन डोळे, नाक, तोंड,तुरा असतो. मात्र या दुर्मिळ कोंबडीला पुढे दोन पाय आणि मागच्या बाजूला दोन पाय आहेत.

अल्फान्सो या कोंबडीची जास्त काळजी घेत आहेत, कारण या कोंबडीला इतर कोंबड्याप्रमाणे चालता येत नाही.

या कोंबडीला पाहून स्थानिकांना अचंबित व्हायला होत.

अल्फान्सो यांनी या संदर्भात काय म्हटलंय?

त्या दिवशी मी दुपारी झोपलो होतो.

त्यावेळी मला आमच्या कोंबडीने चार पायाचे पिल्लू दिल्याचे स्वप्नात आलं.

त्यांनतर मला जाग आल्यावर मी कोंबडीच्या ठिकाणी जाऊन पाहिलं, तर तिच्या अंड्यांतून 10 पिल्लं निघाली होती.

त्यामध्ये एक पिल्लू चार पायांचं होतं.

ही घटना पाहून आपण आश्चर्यचकीत झाल्याचं अल्फान्सो बोलले.

दरम्यान या कोंबडीची  चर्चा संपूर्ण वसईत रंगली आहे. त्यामुळे या दुर्मिळ कोंबडीला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी जमतेय.

Exit mobile version