Fri. Sep 30th, 2022

नगरमध्ये ट्रक-इर्टिगाचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

नगरमध्ये ट्रक-इर्टिगाचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

अहमदनगर-जामखेड रोडवर ट्रक-इर्टिगामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले असून जखमीवर जवळील रूग्णालयाध्ये उपचार सुरू आहे.

अहमदनगर-जामखेड रोडवर पोखरी फाटा येथे ट्रक आणि इर्टिगा गाडीची समोरासमोर धडक झाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी आहेत.

मृतांमध्ये 2 पुरुष एका महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

आज रविवारी पहाटे 4च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

या अपघात मृत्यू झालेले सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत.

सर्वजण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव पिरजादे येथील रहिवाशी आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.