Thu. Jun 20th, 2019

नागपुरात चार वर्षीय मुलीवर बलात्कार

0Shares

नागपुरात एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार एका प्राथमिक शाळेच्या आवारात घडल्याने खळबळ माजली आहे. नागपूर-अमरावती रोडवरील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. पीडित मुलीची आई काचीमेट परिसरातील इमारतींमध्ये घरकामाचं काम करते. आई कामाला गेल्यानंतर मुलगी खेळत असताना हा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित मुलीची आई काचीमेट परिसरातील इमारतींमध्ये घरकामाचं काम करते.

लोकांच्या घरी काम करत असताना ती आपल्या चार वर्षीय मुलीला परिसरात खेळायला सोडते.

सध्या परिसरातील खाजगी प्राथमिक शाळेला सुट्टी असल्याने परिसरातील सर्व मुले शाळेच्या आवारात खेळतात.

काल दुपारी पीडित मुलगी शाळेच्या आवारात खेळत असताना आरोपी भूषण डहाट याने पीडित मुलीला एका खोलीत नेला.

तिला अश्लील चित्रफीत दाखविली. त्यानंतर भूषणने त्या मुलीसोबत अतिप्रसंग केला.

संध्याकाळी पीडित मुलीच्या कपड्यांवर काही खुणा पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पीडित मुलीच्या आईने लगेच आरोपी भूषण डहाटला फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला.

मात्र आरोपी फोन बंद करून फरार झाला आहे. आज सकाळी पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

घटनेची चौकशी आणि मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि लहान मुलांचा लैंगिक छळ असा गुन्हा दाखल केला आहे.

फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपी भूषण डहाट संबंधित खाजगी शाळेच्या महिला शिपायाचा नातेवाईक असून त्याच कारणामुळे तो शाळेच्या आवारात शाळा प्रशासनाने दिलेल्या खोलीत राहत होता.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: