Fri. Sep 30th, 2022

देवीच्या मूर्तींच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी होते. यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या तिथी आहेत. यंदा करोननांतर पहिल्यांदाच गणेशोत्सव अगदी धामधुमीत पार पडला. त्यामुळे नवरात्रोत्सवही तेवढ्याच धामधुमीत पार पडणार आहे.

दरम्यान, नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून याकरिता देवीच्या मूर्त्या बनवण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत. मात्र मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग महागल्यामुळे यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. याच कारणामुळे मूर्तीकारांना मूर्त्यांना रंग देताना अडचणीचा सामना करावा लागतोय. येवला शहरातील कारागीर देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न असल्याचे दिसून येत असले तरी येथील सततच्या पावसामुळे वातावरणात ओलावा आहे. याच कारणामुळे घडवलेल्या मूर्त्या अद्याप ओल्याच आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र मूर्तीकारांना मूर्त्यांवर रंग चढवण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे मूर्तीसाठी वावरण्यात येणारे रंगही या वर्षी महागले आहेत. त्यामुळे देवीच्या मूर्तींच्या किमतीमध्ये ४० ते ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तशी माहिती येवला येथील मूर्तीकारांनी दिली आहे.

2 thoughts on “देवीच्या मूर्तींच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ

  1. Good – I should definitely pronounce, impressed with your site. I had no trouble navigating through all tabs as well as related info ended up being truly simple to do to access. I recently found what I hoped for before you know it in the least. Reasonably unusual. Is likely to appreciate it for those who add forums or anything, website theme . a tones way for your customer to communicate. Nice task.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.