Mon. Aug 10th, 2020

४०० गावठी बाँम्बसह परप्रांतीय शिकाऱ्याला अटक

कराड : पाटण तालुक्यातील तारळे परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या परप्रांतीय शिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. या शिकाऱ्याकडून पोलिसांनी डुक्कर मारण्यासाठीचे असलेले ४०० गावठी बाँम्बसह जप्त केले आहे. उंब्रज पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट सोने देवून ग्राहकाची फसवणूक आणि मारहाण करणाऱ्या स्थानिक भामटयाचा यात सहभाग असल्याचे चौकशीनंतर समोर आलं आहे. पोलिसांनी संशयिताकडून गावठी बाँम्बसह ७ मोबाईल आणि २० हजार रुपयांची रोकड जप्त केली.

अमर लुंगा आदिवासी मक्कड असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून शुक्रवारी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना त्या ठिकाणी जाऊन तपासाला सुरुवात केली. यावेळेस रस्त्यावर व्यक्ती फिरताना नजरेस पडला.

पोलिसांनी या व्यक्तीची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्या व्यक्तीच्या पिशवीत गावठी बॉम्ब सापडले. हे गावठी बॉम्ब डुकरांच्या शिकारीसाठी वापरणार असल्याची माहिती त्या शिकाऱ्याने चौकशी दरम्यान दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *