Fri. Jul 30th, 2021

तळघरातल्या वाहनतळात ४०० वाहनं बुडाली

कांदिवली :  शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर उपनगरातील अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेली वाहनं पाण्याखाली गेल्या. कांदिवली भागात ठाकूर कॉम्प्लेक्स आणि ठाकूर व्हिलेजमध्ये असलेल्या पावसाचं पाणी साचलं. तळमजला पार्किंगमध्ये २० फुटांच्या वर पाणी साचल्यामुळे जवळपास ४०० वाहनं बुडाल्याची माहिती आहे.

रात्री चार तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. अनेक जणांच्या घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर गाड्या अडकून पडल्या.आता वाहनं बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे . या पार्किंग क्षेत्रामघ्ये रिक्षा आणि दुचाकींचे प्रमाण अधिक आहे . पार्किंग क्षेत्रामध्ये गाड्या बाहेर काढण्यासाठी नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *