Mon. Jul 13th, 2020

42 वधूंसाठी 5000 वरांची रांग!

सुरतमधील पाटीदार समाजाने आपल्या समाजातील मुलांसाठी वधुसंशोधनाचं आंदोलन हाती घेतलं आहे. या आंदोलनात दुसऱ्या राज्यातील कुर्मी समाजातील मुली मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ओदिशातील कुर्मी परिवारातील 42 उपवर मुली विवाह मेळाव्यासाठी आणल्या गेल्या. गरीब परिवारातील या मुलींसाठी 5000 पाटीदार तरूण रांगेत उभे होते.

लग्नासाठी कुर्मी मुलीचं का?

गुजरातमध्ये महिला पुरूषांमधील गुणोत्तर अत्यंत कमी आहे.

हरियाणा, राजस्थानप्रमाणेच येथील तरूण मुलांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालं आहे.

म्हणून इतर राज्यांतील कुर्मी समाजाच्या मुलींना गुजरातमध्ये आणण्याचे प्रयत्न पटेल संस्था करत आहेत.

ओदिशातून आलेल्या या मुली कपडे विणण्याचं काम करणार्‍या गरीब विणकरांच्या मुली आहेत.

शुक्रवारी पार पडलेल्या या मेळ्यात सर्व मुलींची लग्नं पक्की झाली.

16 ऑक्टोबरला त्यांचा सामूहिक विवाहसोहळा होणार असल्याचं सांगिण्यात येत आहे.

गुजराती पाटीदार समाजाने लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याची अडचण लक्षात घेऊन ही परंपरा सुरू करण्याचं काम हाती घेतलंय. मात्र 42 मुलींसाठी 5000 मुलांची स्थळं आली, यावरूनच गुजरातमध्ये मुलींच्या जन्मदाराची समस्या किती गंभीर आहे हे दिसून येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *