Jaimaharashtra news

आसाममध्ये 10 नद्यांना पूर, 45 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, आसाम

 

आसाममध्ये झालेल्या पावसामुळे तिथल्या 10 नद्यांना महापूर आला. यामुळे आसाममध्ये पुराचा कहर माजला. या पुराचा फटका 17 लाखापेक्षा जास्त लोकांना बसला. तर 45 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली.

 

 

या पुरामुळे आसामची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आसाममधले 24 जिल्हे पूरग्रस्त आहेत. तर सुमारे 2 हजारांपेक्षा जास्त खेडी जलमय झाली आहेत.

 

 

एक लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं. या पुराचा फटका फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही बसला. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय अभय अरण्याचा 80 टक्के भाग जलमय झाला आहे. इतक्या भयंकर पुरामुळे २५ प्राण्यांचा मृत्यू झाला. पुरामुळे जे लोक बेघर झालेत त्यांनाही सुरक्षित स्थळी पोहचवण्याचं काम केलं जातं.

Exit mobile version