Sun. May 16th, 2021

पुण्यातील ४५ पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व प्राप्त

पुण्यात गुरुवारी ४५ पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानहून पुण्यात राहत असलेल्या पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तान हिंदू हे यापूर्वी पाकिस्तानात राहत होते. मात्र काही अडचणींना सामना करावा लागत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी ते भारतात आले. त्यानंतर पाकिस्तानी हिंदू पुण्यात वास्तव्याला होते.

४५ पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व –

गुरुवारी ४५ पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे.

हे पाकिस्तानी हिंदू गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला आहेत.

भारतीय नागरिकत्वासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न केले होते.

मात्र आम्हाला आता भारतीय नागरिकत्व मिळाल्याने खूप आनंद होत असल्याचे जयप्रकाश नेभवाणी यांनी म्हटलं आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यलयात ४५ पाकिस्तानी हिंदूंना कायदेशीररित्या नागरिकत्व मिळाले.

पाकिस्तानमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे काम-धंद्यानिमित्त ४५ जण पुण्यात आली.

भारताचे मागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होते.

तसेच भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अनेक अडचणी आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या ४५ जणांचे कागदपत्रे तपासून त्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यलयात भारतीय नागरिकत्व मिळाले.

नागरिकत्व नसल्यामुळे पाकिस्तानी हिंदूंना नागरिकांप्रमाणे रेशन कार्ड, आधार कार्ड यांसारख्या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागल्याचे सांगितले.

२० वर्षांपासून आम्ही भारतात वास्तव्यात आहोत. आम्ही एका लग्नाला आलो होतो, असे लाज विरवाणी यांनी म्हटलं आहे.

यावेळी आपण इथेच राहू असे लाज विरवाणी यांनी आपल्या पतीला म्हटलं. पाकिस्तानात आपल्या घराबाहेर पडणं पणही त्रासदायक असल्याने आपण इथेच राहू असे म्हटलं.

पाकिस्तानमध्ये गुन्हेगारी वाढत असल्यामुळे घराबाहेर पडणं त्रासदायक होते, असे एका पाकिस्तानी हिंदूने सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *