Sat. Jul 11th, 2020

पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीला दारू पाजून 5 जणांकडून सामूहिक बलात्कार!

महाराष्ट्राचं पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. 17 वर्षांच्या मुलीला मद्य पाजून तिच्यावर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पंढरपूर पोलीस स्थानकात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आत्तापर्यंत 4 आरोपींना ताब्यात घेतलंय.

काय आहे प्रकरण?

5 आरोपींपैकी एका तरुणाची पीडित तरुणी मैत्रीण होती.

मित्र तिला एका अज्ञात स्थळी  तिला एका अज्ञात स्थळी भेटायला बोलवलं.

तेथे इतर 4 जणही हजर होते.

मित्रानेच या 4 जणांना तिच्यावर बलात्कार करण्यास सांगितलं.

त्यानंतर चौघांनी तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला.

पाचव्या आरोपीने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ शूट केला.

जर याबद्दल कुणाला सांगितलं, तर हा व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी पीडित तरुणीला देण्यात आली.

त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने याबद्दल कुणालाच काही सांगितलं नाही.

मात्र पीडितेच्या भीतीचा आरोपींनी आणखी गैरफायदा घेऊन व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देत तिला परत परत बोलावून घेत आणि तिच्यावर बलात्कार करत.

पीडितेवर या तरुणांनी अनेकवेळा बलात्कार केला.

व्हिडिओ अपलोड न करण्याच्या बदल्यात त्यांनी तिच्याकडे पैशांचीही मागणी केली.

आपल्या मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचं पीडतेच्या आईच्या लक्षात आलं. याबद्दल तिने मुलीची विचारपूर केली असता, तिने आपल्याबाबतीत घडणारा प्रकार आईला सांगितला.

त्यानंतर मात्र पीडितेच्या घरच्यांनीच यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कडक कारवाई करत 4 जणांना अटक केली आहे. तर पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *