26/11 दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेची मोठी घोषणा
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज(सोमवारी)10 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी एक मोठी घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.
’26/11 च्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या हाफिज सईद आणि झकी उर रहमान लख्वी यांना पकडण्यास मदत करणाऱ्याला 35 कोटींचं बक्षिस देण्यात येईल ,’ असे ANI च्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ला केला. यामध्ये 166 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. या दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्यास या बक्षिसाची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.