Sat. Jul 31st, 2021

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ५ कोरोना बाधित रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी ५ कोरोना बाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या ८ वर पोहचली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 15 तर राज्यातील संख्या 31 वर जाऊन पोहचली आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील 41 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यापैकी ५ नमुने पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधील चिंता देखील वाढू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका

एकूण ॲडमीट रूग्ण संख्या = 48

तपासणीसाठी पाठविलेले नमुने = 48

प्राप्त झालेले तपासणी अहवाल = 12

कोरोना बाधित रूग्ण = 8

कोरोना बाधित नसलेले रूग्ण = 4

डिस्चार्ज रूग्ण = 4

प्रतीक्षेतील अहवाल बाकी = 36

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *