Mon. Dec 6th, 2021

धारावीत आढळले ५ नवे कोरोना रुग्ण

मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या भीषण लाटेतही करोनाला हद्दपार करणाऱ्या धारावीकरांसाठी चिंतेत भर घालणारी बातमी आहे. आज गुरुवारी धारावीत ५ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. याबरोबरच धारावीत आतापर्यंत एकूण ६ हजार ९२९ रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याच्या घडीला धारावीत एकूण २६ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत धारावीत ६ हजार ५४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत ही दिलासादायक बाब आहे. त्याच बरोबर दादरमध्ये ९ नव्या रुग्णांचे निदान करण्यात आले आहे तर माहीममध्ये आज १० रुग्णांची भर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *