Wed. Dec 8th, 2021

सीमारेषेवर पाक सैन्याचे शस्त्रसंधीचे उल्लंघन; 5 पाक सैनिक ठार

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानात घुसून जैशच्या तळांवर १००० किलो वजानाचे बॉम्ब फेकून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. हवाई दलाने हल्ला केल्यामुळे पाकिस्तानही हल्ला करू शकतो असे वर्तवण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नौशेरा आणि बारामुल्ला भागात  भारतीय जवानांवर गोळीबार आणि ग्रेनेडने हल्ला करत आहेत. यामध्ये भारताचे ५ जवान जखमी झाले असून पाकिस्तानचे ५ सैनिकांना कंठस्नान घातल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

हावई दलाने मंगळवारी पाकिस्तानात घुसून जैश ए मोहम्मदच्या तळांना उद्धवस्त केले.

यामुळे पाकिस्तानी सैन्यांनी एलओसीवर १२ ते १५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

तसेच LOC वर १२ ते १५ ठिकाणी उखळी तोफांचा मारा केला.

पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या हद्दीतील LOC जवळ असलेल्या नागरिकांच्या घरांआड मिसाईल सोडले आहेत.

भारतीय जवानांनी याचे प्रयुत्तर देत पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त केल्या आहेत.

यामध्ये भारताचे ५ जवान जखमी झाले असून दोन जवानांना मिलीटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *