Sat. Jun 12th, 2021

राजधानीत दहशतवाद्यामध्ये आणि दिल्ली पोलीसात चकमक

दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर सामग्री जप्त…

दिल्ली पोलीस आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाल्याचं समोर आलं आहे. विशेष या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर सामग्री होती. दिल्ली पोलीस यांनी ही सामग्री आणि शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार,“दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर पाच जणांना अटक करण्यात आली असून यामधील दोघेजण पंजाब तर तिघे जण काश्मीरचे आहेत. शस्त्र आणि इतर साहित्य त्याच्याकडून जप्त करण्यात आलं आहे”. या सर्व दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा करत असल्याचं समोर आलं आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान सध्या दिल्ली पोलीस त्यांना विचारपूस करत आहे तर अद्याप याप्रकरणी कुठलेही माहिती मिळालेली नसल्याचंही दिल्ली पोलिसांनी यावेळी सांगितली. अटक झालेल्या दहशतवाद्यामध्ये एकाचा शौर्यचक्र विजेता बलविंदर सिंग यांच्या हत्येत सहभाग असल्याची शक्यता असून पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *