5 हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था गाठणं स्वप्नच – मनमोहन सिंग

गेल्या महिन्याभरापासून देशाची आर्थिक परिस्थिती स्थिर नसून विरोधकांनी अर्थव्यवस्थेवर प्रचंड टीका केली आहे. 2024 सालापर्यंत 5 हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठणं हे स्वप्नच ठरणार असल्याची शक्यता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनमोहन सिंग यांनी आर्थिक स्थितीचे विश्लेषण केल्यानंतर सांगितले आहे. देशावर अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे कॉंग्रेस देशभर आंदोलन करणार असल्याचेही म्हटलं आहे.
काय म्हणाले मनमोहन सिंग ?
भारताची आर्थिक स्थिती स्थिर नसल्याने अर्थव्यवस्थेवर विरोधक टीका करत आहे.
2024 पर्यंत 5 हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठणं स्वप्नच राहणार असल्याची शक्यता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे.
कॉंग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचं विश्लेषण केलं आहे.
२०१८-१९ मध्ये देशाची अर्थव्यवस्था 2.7 हजार अब्ज डॉलर होती.
पाच वर्षांंमध्ये दुपटीने वाढवायची असेल तर वार्षिक आर्थिक विकासाचा दर नाममात्र दर (चलनवाढीच्या दरासह) १२ टक्के, तर वास्तविक दर (चलनवाढ वगळून) ९ टक्के असावा लागेल.
मात्र सध्याच्या स्थिती लक्षात घेता विकास दर गाठता येईल अशी शक्यता दिसत नाही अशी खंत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.