जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोर, 5 ते 7 अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीम आणि अतिरेक्यांना प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या 5 ते 7 अतिरेक्यांना भारतीय जवानांकडून खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या बॅड कमांडोंचाही समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. अतिरेकी आणि कमांडोंचे मृतदेह अद्यापही नियंत्रण रेषेवर पडून असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे

पाकिस्तानची घुसखोरी!

चकमकीनंतर भारतीय जवानांनी पुरावा म्हणून सॅटेलाइटद्वारे नियंत्रण रेषेवर अद्याप पडून असलेल्या 4 अतिरेक्यांच्या मृतदेहाचे फोटे काढले आहेत.गेल्या 24 ते 36 तासांपूर्वी भारतीय जवानांनी कारवाई केली आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे.

भारतीय सैन्याला गोळीबार करण्यात अडकून जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांची भारतात घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा कट होता.त्याचाच एक भाग म्हणून 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान बॅट कमांडोंच्या सहाय्याने पाकिस्तानने अतिरेक्यांची भारतात घुसखोरी करण्याचा केला.

भारतीय जवानांनी पाकिस्तानाचे प्रयत्न हाणून पाडत 5 ते 7 अतिरेक्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर अतिरेक्यांचे मृतदेह नियंत्रण रेषेवर पडून आहेत. भारताने मृतदेह ताब्यात घेऊ नये म्हणून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्यानं गोळीबार केला जात आहे.

 

Exit mobile version