10 रुपयांच्या ‘शिवभोजन योजने’ बद्द्ल हे माहिती आहे का ?

हिवाळी अधिवशेनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या. यात शिवभोजन योजनेबद्दलची घोषणा करण्यात आली. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात 10 रुपयात जेवण देण्याचं आश्वासन दिलं होतं.

यानंतर आता शिवभोजन योजनेच्या केंद्रांची सुरुवात करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

राज्यभरात सुरुवातीला 50 ठिकाणी या केंद्रांची सुरुवात करण्यात येईल. सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे. यासेवेच्या प्रतिसादानंतर ही योजना राज्यभर विस्तार करु असे मुख्यमंत्री म्हणाले.

वचननाम्यात दिलेल्या वचनांपैकी एक वचन म्हणजे शिवभोजन योजनेची सुरु करत आहोत. लवकरच या योजनेचं उद्घाटन होणार आहे.

या उद्घाटनाला मी आपल्या सर्वांना मी आंमत्रण देतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version