Fri. Sep 17th, 2021

मोदींच्या मंत्रिमंडळात 57 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे कोट्यधीश

नरेंद्र मोदी यांच्या 2.0 मंत्रिमंडळात 57 मंत्र्यांचा समावेश असून त्यांचा शपथविधी देखील नुकताचं पार पडला आहे. या 57 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. (ADR) म्हणजेच आहे. असोसिएशन फॉर ड्रेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने या मंत्र्यांची संपत्ती आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा अहवाल सादर केला आहे. मोदी मंत्रिमंडळातील ओडिशाचे प्रताप सारंगी हे सर्वात गरीब मंत्री आहेत तर अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर या सर्वांत श्रीमंत नेत्या ठरल्या आहेत.

मोदींच्या मंत्रीमंडळात हे श्रीमंत नेते

असोसिएशन फॉर ड्रेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR)या संस्थेने एक अहवाल सादर केले आहे.

यामध्ये मोदींच्या मंत्रीमंडळात 51 मंत्री हे कोट्याधीश असलेचे या अहवालात म्हटलं आहे.

खासदार हरसिमरत कौर यांच्याकडे 217 कोटींची संपत्ती आहे

पियूष गोयल दुसऱ्या क्रमांकावर असून  त्यांच्याकडे ९५ कोटींची संपत्ती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 46 व्या क्रमांकांवर असून त्यांच्याकडे २ कोटींची संपत्ती आहे.

संजीव कुमार बलियान, किरण रिजीजू, साध्वी निरंजन ज्योती यांच्याकडे १ कोटींची संपत्ती आहे.

तिसऱ्या क्रमांकार राव इंद्रजीत सिंह  आहेत त्यांच्याकडे  42 कोटींची संपत्ती आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहांकडे 40 कोटींची संपत्ती आहे.

रामेश्वर तेली(43 लाख) , व्ही. मुरलीधरन ( 27 लाख), एवढी संपत्ती आहे.

कैलाश चौधरी (24 लाख) आणि प्रताप सारंगी (13लाख) अशी संपत्ती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *