Sat. Sep 21st, 2019

मुंबईमधील दहीहंडी दरम्यान 51 गोविंदा जखमी

गोकुळाष्टमीनिमीत्त मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह होता. दादर, ठाणेसह मुंबईमध्ये हा उत्साह आहे. परंतु मुंबईत या उत्सवाला गालबोट लागलं आहे.

0Shares

गोकुळाष्टमीनिमीत्त मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह होता. दादर, ठाणेसह मुंबईमध्ये हा उत्साह आहे. परंतु मुंबईत या उत्सवाला गालबोट लागलं आहे. दरम्यान 51  गोविंदा जखमी झाले आहेत. सायन रुग्णालय 4, नायर 6,केम 12
जेजे 1, जसलोक 1, शताब्दी 2, अग्रवाल 1, राजावडी 10, कूपर 4, ट्राम केअर 3, वि एन देसाई  1, शताब्दी कांदिवली 6 असे उपचार सुरू आहेत.

 मुंबईत दहीहंडीचा थरार

दरवर्षी मुंबईमध्ये दहिहंडीचा थरार पाहायला मिळतो. या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादले जातात. परंतु दरवर्षी यामध्ये गोविंदा जखमी होतात. यावर्षीही या कार्यक्रमाला निर्बंध लादूनही कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. यामध्ये 51 गोविंदा जखमी झाले आहेत.सायन रुग्णालय 4, नायर 6,केम 12  जेजे 1, जसलोक 1, शताब्दी 2, अग्रवाल 1, राजावडी 10, कूपर 4, ट्राम केअर 3, वि एन देसाई  1, शताब्दी कांदिवली 6 असे उपचार सुरू आहेत.

काळाचौकीमधील विग्नेश काटकर, वरळीतील उदय क्रिडा मंडळातील अनिकेत सुतार आणि लालबागमधील श्री साई देवस्थान गोविंदा पथकचे सुनिल सावंत जखमी झाले आहेत. 51 पैकी तिघांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यावर्षी पुरग्रस्तांना मदत म्हणून मुंबईतील अनेक दहिहंडी रद्द करण्यात आल्या आहेत. तरिही काही ठिकाणी दहिहंडीमध्ये गोविंदांचा थरार पहायला मिळाला आहे. ठाणे आणि दादरमध्ये हा दहिहंडीचा थरार पाहायला मिळाला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *