Tue. Jun 18th, 2019

#IndiaElections2019 : पहिल्या टप्प्यात साडेपाचपर्यंत 55.97 टक्के मतदान 

24Shares

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 7  मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 55.97 टक्के  मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होतेकाही ठिकाणच्या अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडले. यामध्ये  वर्धा 55.36 टक्के, रामटेक (अ.जा.) 51.72 टक्के, नागपूर 53.13 टक्के, भंडारा-गोंदिया 60.50 टक्के, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) 61.33 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के आणि यवतमाळ-वाशिम 53.78 टक्के इतके मतदान झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, गर्देवाडा (पुसकोठी), गर्देवाडा (वांगेतुरी) या 4  मतदान केंद्रांवर मतदान झालं नाही. या मतदान केंद्रांवर नंतर मतदान होईल.

राज्यात  साडेपाचपर्यंत 55.97 टक्के मतदान

वर्धा – 55.36 टक्के
रामटेक – 51.72 टक्के
नागपूर – 53.13 टक्के
भंडारा-गोंदिया-  60.50 टक्के
गडचिरोली-चिमूर – 61.33 टक्के
चंद्रपूर – 55.97 टक्के
यवतमाळ-वाशिम – 53.78 टक्के.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, गर्देवाडा (पुसकोठी), गर्देवाडा (वांगेतुरी) या 4  मतदान केंद्रांवर मतदान झालं नाही
या मतदान केंद्रांवर नंतर मतदान होईल.

24Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *