Fri. Jan 28th, 2022

अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल; ३१५ आरोपींना अटक

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्रिपुरा येथे धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याविरोधात मुस्लिमांचा अमरावतीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम मोर्चेकऱ्यांनी शहरातील दुकानांवर दगडफेक करत दुकानांची तोडफोड केली. मुस्लिम मोर्चेकरांनी दगडफेक आणि तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच शहरात जातीय तणाव, भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आले. त्रिपुरा येथे धर्मगुरू हजरत मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल काही कट्टरपंथी यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ रजा अकादमी आणि इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्रात आंदोलने केली गेली. त्यामुळे अमरावतीत हिंसाचारदरम्यान झालेल्या नुकसान लूटमार करणाऱ्यांविरोधात आतापर्यंत एकूण ५७ गुन्हे दाखल केले असून ३१५ आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी दिली आहे.

   अमरावतीमधील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने अमरावतीमध्ये संचारबंदी लागू केली. अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला असून ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रशासनाने मनाई केली होती. तसेच इंटरनेट सेवादेखील बंद केली. अमरावतीत सकाळी ७ वाजतापासून तर रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ वाजतापासून तर सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी राहणार आहे. जवळपास १५ तास शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे.

   मात्र अमरावती शहरात घडलेल्या हिंसात्मक घटनेवर पोलिसांनी नियंत्रण मिळविल्यानंतर शहरातील संचारबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तर सर्वत्र आता शांतता असून सर्व सुरळीत झाली आहे, असेही पोलिस आयुक्त सिंह यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *