Jaimaharashtra news

‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर सडेतोड उत्तर देऊ’

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यानंतर आता भारतीय लष्कराकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. भारताकडे वाकड्या नजरेने पहाल तर सडेतोड उत्तर देऊ असा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी तालिबानी दहशतवाद्यांना दिला आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा करणार हे निश्चित होतं. पण ते इतक्या जलदगतीने हालचाल करतील आणि अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतील असं वाटलं नव्हतं असं सरंक्षण दलाचे मुख्य प्रमुख बिपिन रावत म्हणाले. २० वर्षांपूर्वीप्रमाणे आताही भारतात घुसखोरी होण्याची शक्यता असून त्यासंबंधीच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची तयारी करण्यात आली आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराने आपातकालीन योजना तयार केली आहे अशी माहिती रावत यांनी दिली.

Exit mobile version