Jaimaharashtra news

अजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर

मुंबई (दि. ०४/०९/२०२१):

‘नियम पाळा नाहीतर सगळं बंद’, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल महाराष्ट्रातील जनतेला दिला होता. परंतु ‘टाळेबंदी अथवा कठोर निर्बंध नको, रोजगार महत्वाचा’ असे सडेतोड उत्तर जनतेने दिले आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या ट्विटर सर्वेक्षणातुन ही बाब समोर आली आहे.

महाविकास आघाडीतील काही मंत्री वारंवार कठोर निर्बंध तसेच टाळेबंदीचा उल्लेख करीत असतात. पुण्यात अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांसमोर काही वक्तव्ये केली. ‘ नियम पाळा नाहीतर सगळं बंद’, असा इशारा अजित पवारांनी दिला होता. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीने ट्विटरवर याविषयी एक पोल घेण्यात आला.

ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना पर्याय देण्यात आले.

१. होय, टाळेबंदी आवश्यक २. नाही, रोजगार महत्वाचा ३. सरकारने निर्णय करावा ४. सांगता येत नाही, असे चार पर्याय देण्यात आले होते. जय महाराष्ट्र वृत्तसंस्थेने दिलेल्या चार पर्यायांपैकी ५२.९ टक्के लोकांनी ‘टाळेबंदी नको, रोजगार महत्वाचा’ हा पर्याय निवडला आहे.

तर २८.६ टक्के लोकांनी ‘होय, टाळेबंदी आवश्यक’ असल्याचे म्हटले आहे. ८.४ टक्के नागरिकांनी याविषयीचा निर्णय सरकारवर सोपविला आहे. तर १०.१ टक्के लोकांनी ‘सांगता येत नाही’ हा पर्याय निवडला आहे.

पन्नास टक्क्यांहून अधिक लोकांचा कठोर निर्बंध अथवा ‘सगळं बंद’ला विरोध असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्राच्या जनतेला इशारा देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना जनतेने सडेतोड उत्तर दिले आहे, असे म्हटले पाहिजे.

Exit mobile version