Tue. Jun 28th, 2022

देशात ५जी सेवा लवकरच

आत्मनिर्भर भारतअतंर्गत देशाने पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. आयआयटी मद्रासमध्ये ५जी कॉलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी रात्री ५जी व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल केला. संपूर्ण डिझाइन भारतामध्येच विकसित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. हे नेटवर्क विकसित करण्यासाठी एकून ८ इन्स्टिट्यूटची मदत घेण्यात आली आहे.

संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान हे या सेवेचे वैशिष्ट्य आहे. या ५G कॉलचा टेस्टिंग व्हिडीओ केंद्रीय मंत्र्यानी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या सेवेचे एन्ड टू एन्ड नेटवर्क भारतात तयार करण्यात आले आहे.सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत भारतामध्ये स्वदेशी ५जी चा आराखडा तयार करण्यात येईल, असे अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी म्हटले होते.

५G सेवा सुरू झाल्यानंतर या तंत्रज्ञानाचा भारताला मोठा फायदा होणार आहे. स्वदेशी ५G तंत्रज्ञान स्वदेशी ५G खाजगी कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास मदत करेल. देशातील पहिला ५G कॉल ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी जून ते जुलै दरम्यान स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया घेण्यात येणार आहे. स्पेक्ट्रमचा लिलाव २० वर्षांसाठी असेल किंवा ३० वर्षांसाठी असेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.