Wed. Oct 5th, 2022

अंनिसची आज राज्यभरात निदर्शनं…

जय महाराष्ट्र न्यूज, पूणे

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत.  पुण्यात आज अंनिसचे सर्व कार्यकर्ते येऊन ‘जवाब दो’ आंदोलन करत आहेत.
 
यामध्ये हमीद मुक्ता शैलजा दाभोळकर कुटूंबासह सोनाली कुलकर्णी, बाबा आढाव राज्यातील कार्यकर्ते सहभागी झालेत. ही रॅली वीर शिंदे पुलापासून सानेगुरुजी स्मारकापर्यंत जाणार आहे. त्या ठिकाणी आज दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.
 

20 ऑगस्ट 2013

स्थळ पुणे – मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या डॉ नरेंद्र दाभोळकरांवर गोळीबार करुण हत्या 

16 फेब्रुवारी 2015 – स्थळ कोल्हापूर

मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरेंवर गोळीबार

गोळीबारात गोंविद पानसरेंचा मृत्यू तर उमा पानसरे जखमी

30 ऑगस्ट 2015

स्थळ कलबुर्गींचे घर- एम एम कलबुर्गी यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार 

5 सप्टेंबर 2017

स्थळ बेंगलोर – गौरी लंकेश यांचे राहते घर

 • दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गौरी लंकेश यांच्यावर गोळीबार
 • हल्यात गोरी लंकेश यांचा मृत्यू 
 • चौघांची हत्या एकाच पध्दतीने 
 • हत्यारे शोधण्यास विलंब होत असल्याने उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेना झापले 
 • एसआयटीने 16 सप्टेंबर 2015 मध्ये समीर गायकवाडला सांगलीतून अटक केली 
 • त्यानंतर सीबीआय ने 11 जून 2016 ला अटक केली  मात्र त्यांच्याकडून पुढे कोणतीच माहिती हाती लागली नाही.
 • सारंग अकोळकर आणि विनय पवार यांच्यावर 10 लाखांचे बक्षीस लावूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही 
 • नवीनकुमार, मोहन नायक, मनोहर एडवे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन, राजेश बंगेरा, भारत कुरणे, सुरेशकुमार आणि अन्य चार अशा बारा जणांच्या मुसक्या एसआयटीने आवळल्या
 • एसआयटीने केलेल्या अटकेमुळे तपास अंतिम टप्यात आला 
 • आरोपींकडून कलबुर्गींच्या हत्येचा धागेदोरेही हाती लागले
 • यापैकी काहींनी या हत्येमध्ये सहभाग असल्याची दिली कबुली 
 • कर्नाटक एसआयटीने तपासात कोणतीही शक्यता मागे ठेवली नाही. 
 • जी माहिती उपलब्ध झाली त्याच गतीने तपास सुरू ठेवला
 • महाराष्ट्रतूनही त्यानी काही संशयतीना अटक केली

सद्याच्या घडामोडीत 

 • डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणात औरंगाबादमधून सचिन अणदूरेला सीबीआयने अटक केली 
 • सचिन उणदुरेनं दिली दाभोळकरांच्या हत्येची दिली कबुली
 • तर वैभव राउतला रात्री नवी मुंबई एटीएसने चौकशी केली. त्यानंतर आज सकाळी वैभव राऊतला चौकशीसाठी घेवनू गेले.
 • दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे एटीएसने जालण्यातून शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला केली अटक

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.