Mon. Jan 24th, 2022

‘आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य’ – नितीन गडकरी

चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यामुळे आता चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढणार आहे.

नितीन गडकरी यांनी ट्विट केले, ‘आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी ६ एअरबॅग अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याबाबतचा मसुदा जीएसआर अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे.’

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच जुलै २०१९पासून चालक एअरबॅग आणि १ जानेवारी २०२२पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगची फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.

भारतातील चारचाकी वाहनांमधील प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *