Sun. Oct 24th, 2021

बँकॉक मध्ये 6 साखळी बॉम्बस्फोट, 4 जण जखमी

बँकॉक शहरातील विविध ठिकाणी शुक्रवारी सकाळी सहा साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून हे बॉम्बस्फोट सुरू असून यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत.

बँकॉक शहरातील विविध ठिकाणी शुक्रवारी सकाळी सहा साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून हे बॉम्बस्फोट सुरू असून यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी घेतलेली नाही. सकाळपासून या बॉम्बस्फोटांमुळे बँकॉक हादरून गेलं आहे.

बँकॉक मध्ये साखळी बॉम्बस्फोट

शुक्रवारी सकाळी  बँकॉकमध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणी  साखळी बॉम्बस्फोट  झाले आहेत. बँकॉक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून हे बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत.

बँकॉकमध्ये साऊथइस्ट आशिया देशांची सुरक्षाविषयक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये संयुक्त राष्ट्रांसह चीन आणि अन्य देशांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होणार होते. म्हणूनच हा बॉम्बस्फोट झाल्याचं बोललं जातं आहे.

यातील 2 बॉम्बस्फोट सकाळी9 वाजता झाले. 3 रा सरकारी इमारतीजवळ झाला. असे वेगवेगळ्या ठिकाणी 6 बॉम्बस्फोट झाले आहेत. यामध्ये चार जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या साखळी हल्ल्याची जबाबदारी अजून कोणी घेतलेली नाही. थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी या साखळी बॉम्बस्फोटांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *